भाव / emotions
Scroll down to get English translated version...
“आदू… एक विचारू?” जननी हळू आवाजात म्हणते.
आदू मंद हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवते “हो ग, विचार ना.”
“आदू… एखाद्या माणसाने आपल्याला खूप दुखावलं असतं, त्रास दिला असतो, कधी कधी अपमानही केला असतो… तेव्हा आपल्याला खूप राग येतो, आपण शब्दात सगळं बाहेर काढतो. पण काही दिवसांनी… काही महिन्यांनी… कधी अनेक वर्षांनीसुद्धा त्या माणसाचा विचार आला की ओठांवर हसू का येतं? का गं असं? दुखावणाऱ्या व्यक्तीची आठवण आली तरी हसू कसं येतं?”
आदूने थोडा श्वास घेतला. खिडकीतून बाहेर पाहत ती म्हणाली, “कारण त्या माणसासाठी आपल्या हृदयात एक कोपरा असतो. त्या कोपऱ्यात आपण त्याला जपून ठेवलेलं असतं. त्याच्याबद्दल आपल्याला काळजी असते, प्रेमही असतं… आणि प्रेम कधीही तुटत नाही ग.”
जननी गोंधळून विचारते, “पण अगं, आपण तर रागावलो होतो त्या व्यक्तीवर मग तरी?…”
आदूने जननीचा हात हातात घेतला “हृदयसम्बन्धस्य आविर्भावः कोपः .... आपला रागही प्रेमाचा एक भाग असतो. जेव्हा तो माणूस आपल्याला दुखावतो, आपल्याला वेदना होतात. त्या वेदनेचे रूप म्हणजे राग. राग व्यक्त करणं म्हणजे त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात महत्त्व अधोरेखित करणं. ज्याच्यावर आपण प्रेम करतो, काळजी करतो, त्याच्याकडेच आपण अशा भावना व्यक्त करतो.”
जननी शांतपणे ऐकत राहते.
आदू पुढे म्हणाली—
“जेव्हा काही काळ जातो… मन शांत होतं… आठवणी फक्त चांगल्याच राहतात. त्या आठवणी आपल्याला हसू आणतात. ते हसू सांगतं तू आजही माझ्या हृदयात आहेस.”
जननीच्या डोळ्यांतील प्रश्न मिटत गेले. एक शांत, हलकासा भाव उमटला.
“मग, अशा आठवणी जपायला हव्या का विसरून जायला?”
आदूने तिच्या कपाळावर चुंबन दिलं
“जपून ठेव ग. कारण त्या आठवणींमध्येच तुझ्या मनाची कोमलता लपलेली आहे. आणि प्रेम जरी दुखावलं गेलं तरी हृदयाच्या सर्वात सुरक्षित जागी निवांत झोपलेलं असतं.”
जननीला हलकेच हसू आले. खिडकीपाशी तारे अजूनही चमकत होते… पण आता तिच्या मनातही एक उबदार प्रकाश होता. तिने आदूला घट्ट मिठी मारली, "सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी काय असतात तुझ्या कडे उषे..." आदू थट्टेत तिला चापटी मारते, "उषे म्हणायला मी काय तुझ्या बरोबरीची आहे का? आजी आहे मी." जननी, "अच्छा बच्चू... ए बरं सांग ना... कशी काय तुझ्याकडे माझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे असतात?" आदू अभिमानाने, "त्यासाठी मोठं व्हावं लागतं बरका... चला आता बंडू झोपूया." जननी त्रासिक आवाजात, "बंडू नको म्हणू ग, बंडू एकच शिशिर... आपले आबा." तेवढ्यात आजीच्या चेहऱ्यावर खुदकन हसू आले. "बरं बरं... मी झोपले की नंतर सांग हा, तुझ्या हृदयाच्या कोपऱ्यात कोण दडी मारून बसलाय ते..." जननी, "श्या कोण दडी बिडी मारली नाहीये... तूच म्हणतेस ना स्वात्मनि स्नेह्यत आदौ! (love yourself first) तेच... आता झोप तू."
06/11/2025
It was late at night. Cool breeze entered through the window and the stars shimmered in the sky. Janani’s eyes, however, were far away from sleep. She came and sat near her grand- mother.
“Aadu… can I ask you something?” Janani spoke softly.
Her granny smiled gently and ran her fingers through Janani’s hair “Yes dear, ask.”
“Aadu… when someone hurts us deeply, troubles us, sometimes even insults us… we get very angry, we say whatever comes to our mind. But after some days… months… or even years, when we think about that person, why do we smile? If a person has hurt us so much, shouldn’t a different emotion come to our mind?”
Granny took a small breath. Looking out of the window, she said... “Because in our heart, there is a little corner for that person. Where we have kept them safe. We care for them, maybe we even love them… and love never breaks or ends, my child.”
Janani asked in confusion “But Aadu, we were angry at them…”
Aadu, took her hands in her own
“हृदयसम्बन्धस्य आविर्भावः कोपः (Anger manifests only where the heart is connected) Our anger too is a part of love. When that person hurts us, we feel pain. That pain takes the form of anger. Expressing anger means that person has importance in our life. We express such emotions only to the ones we care for and love.”
Janani listened quietly. Aadu, continued
“When time passes… the mind calms down… only the good memories remain. Those memories bring us a smile. And that smile says You are still in my heart.”
Questions slowly faded from Janani’s eyes. A calm, gentle expression appeared.
“So Aadu, should we preserve such memories or try to forget them?”
Aadu kissed her on the forehead and said “Preserve them. Because within those memories lies the tenderness of your soul. And love even when hurt rests peacefully in the safest corner of your heart.”
Janani smiled. The stars outside still shimmered… but now there was a warm light in her heart too.She hugged Aadu tightly, “Why is it that you always have answers to all my questions, Usha…?”
Aadu playfully slapped her cheek,
“Usha? Do you think I’m of your age? I’m your grandmother!”
Janani giggled, “Oh-ho! Then tell me this… how do you always have answers to every question of mine?” Aadu proudly replied,
“For that, one must grow up, my dear… now come on, Bandu, time to sleep.” Janani groaned in irritation, “Don’t call me Bandu… there is only one Bandu… our Aaba.”
At that moment, a shy smile flashed across Aadu’s face. “Alright, alright… but tell me once I fall asleep who you're hiding in the corner of your heart…?” Janani blushed and turned away, “Oh stop it… no one is hiding anywhere… You’re the one who always says, स्वात्मनि स्नेह्यत आदौ!(Love yourself first)… that’s all. Now sleep!”
06/11/2025
Comments
Post a Comment