त्या एका नजरेनंतर After That One Look
This blog consists of both English and Marathi versions. You will find the Marathi version at the end of the English version.
या ब्लॉगमध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही आवृत्त्या आहेत. मराठी आवृत्ती तुम्हाला इंग्रजी आवृत्तीच्या शेवटी सापडेल.
English version...
It was one of those quiet rainy afternoons where time slows down. The gentle rhythm of raindrops against the window created a perfect background score as Mithila sat curled up with her book, lost in a world of words.
Her peace, however, was abruptly interrupted by loud honking and unfamiliar voices echoing through the building.
“Aadu, what’s that noise?” she asked, slightly annoyed.
Her Aaji, ever curious, peeked through the window and replied, “Looks like a new family is moving in… oh, and they have a son. Seems about your age!”
Mithila rolled her eyes, closing her book with a soft thud. “Stop being so nosy, Aadu,” she said, giving her an exaggerated look of disbelief.
Little did she know, this wasn’t just a new family moving into the building. Someone was unknowingly stepping into her life and slowly, into her heart.
A few days later, the new family invited everyone in the society for a Satyanarayana pooja to acquaint themselves.
By coincidence, Mithila and Dhruv were twinning in similar shades. Standing unknowingly beside each other, they became the center of attention for the society aunties, who wasted no time whispering and smiling knowingly, “They look so good together.”
What began as passing glances soon turned into shy “hi’s” exchanged in the staircase.
One afternoon, Mithila carried a bowl of freshly made gajar halwa prepared lovingly by Aadu knowing Dhruv liked it.
She knocked on the door. His mother, busy mopping, called out, “Dhruv! Someone’s here!”
Dhruv walked out, unaware of who was waiting.
For a brief second, time paused.
He had just bathed, droplets of water still tracing their way down his skin. Mithila stood there, unexpectedly aware of his presence in a way she hadn’t been before. Her thoughts stumbled, her calm composure slipping ever so slightly.
The moment he realized it was her, he quickly retreated inside, a hint of shyness on his face.
When he returned, nervous and flustered, even wearing his shirt backward. Mithila was already gone. She simply kept the tiffin at the nearby door and make her way in haste.
On her way back, a neighbour aunty teased, “Oh ho, visiting upper floors now? You should come to our place too sometime!”
Mithila smiled awkwardly and walked ahead.
It was sunset. Soft golden light rested gently on her face. She plugged in her earphones, trying to distract herself but her mind kept drifting back to Dhruv.
Just then, a song by KK began to play...
“Tere ehsaason mein bheege lamhaaton mein mujhko duba…
teri adaayon se dilkash khataao se, in lamho mein zindagi si hai
haya ko jara bhool jaao, meri hi tarah pesh aao
kho bhi do khu ko tum, raaton mein”
She paused it instantly.
Because somehow, the song felt too real.
Later, she met her friends and shared everything. Their excitement was instant. Teasing followed, laughter echoed, and Mithila… just sat there, blushing, unable to deny the unfamiliar warmth growing inside her.
Some stories don’t begin with grand moments.
Sometimes, they begin with rain… a glance… and a heartbeat that lingers a little longer than usual.
Marathi Version...
ती एक निवांत पावसाळी दुपार होता. खिडकीवर पडणाऱ्या सरींच्या मंद तालात सगळं जग जणू शांत झालं होतं. त्या शांततेत मिथिला आपल्या पुस्तकात पूर्णपणे गुंतली होती.
अचानक बाहेरून येणाऱ्या हॉर्नच्या आवाजाने आणि अनोळखी लोकांच्या गडबडीने तिचं लक्ष भंग पावलं.
“आदु, काय गोंधळ आहे बाहेर?” ती थोडीशी वैतागून म्हणाली.
आजीने खिडकीतून डोकावत उत्तर दिलं, “बहुतेक नवीन भाडेकरू येतायत… अरे हो, त्यांना एक मुलगाही आहे. तुझ्याच वयाचा वाटतो!”
मिथिलाने डोळे फिरवत पुस्तक बंद केलं. “आदु, तु खूपच खोचक आहेस,” ती थोडीशी वैतागून म्हणाली.
पण तिला कल्पनाही नव्हती, कोणी तरी फक्त त्या इमारतीतच नव्हे, तर तिच्या आयुष्यात आणि मनातही अलगदपणे प्रवेश करणार होतं.
काही दिवसांनी त्या नवीन कुटुंबाने सोसायटीतील सगळ्यांना ओळख व्हावी म्हणून सत्यानारायणाची पूजा ठेवली.
योगायोग असा की, त्या दिवशी मिथिला आणि ध्रुव दोघांनीही जवळजवळ सारख्याच रंगाचे कपडे घातले होते. नकळत ते एकमेकांच्या शेजारी उभे राहिले… आणि सोसायटीतील काकूंची कुजबुज सुरू झाली...
“किती छान दिसतात दोघं एकत्र!”
हळूहळू जिन्यात भेटल्यावर हलकंसं “हाय” म्हणणं सुरू झालं… आणि त्या छोट्या छोट्या क्षणांना एक वेगळीच गोडी येऊ लागली.
एके दिवशी, आदुने खास करून केलेला गाजर हलवा घेऊन मिथिला ध्रुवच्या घरी गेली. तिला माहिती होतं, त्याला तो खूप आवडतो.
दरवाजा ठोठावल्यावर त्याची आई दिसली. ती घरकामात गुंतलेली होती. “ध्रुव, बघ जरा कोण आलंय!” ती म्हणाली.
ध्रुव बाहेर आला… आणि क्षणभर सगळं काही थांबल्यासारखं वाटलं.
तो नुकताच अंघोळ करून आला होता. केसांमधून आणि खांद्यांवरून पाण्याचे थेंब अजूनही अलगद वाहत होते. मिथिलाच्या मनात एक अनोळखी भावना हलकीशी डोकावून गेली. तिचं लक्ष क्षणभर हरवलं.
ध्रुवने तिला पाहताच थोडासा संकोचून आत पळ घेतला. काही क्षणांनी तो परत आला, घाईगडबडीत शर्ट उलटाच घालून.
पण तोपर्यंत मिथिला तिथून निघून गेली होती.गडबडीत जवळच असलेल्या टेबल वर डब्बा ठेवून तिने तिथून धूम ठोकली.
परत येताना एका काकूंनी चिडवत विचारलं, “अगं, वरच्या मजल्यावर काय काम? कधीतरी आमच्याकडेही ये बरं!”
मिथिला फक्त हसली आणि पुढे निघाली.
संध्याकाळ होत आली होती. मावळत्या सूर्याची सोनेरी किरणं तिच्या चेहऱ्यावर अलगद पडत होती. तिने हेडफोन्स लावले… पण मन मात्र कुठेतरी दुसरीकडेच हरवलं होतं, ध्रुवकडे.
तेवढ्यात KK चं गाणं सुरू झालं...
“तेरे एहसासों में भीगे लम्हातों में…
तेरी अदाओं से
दिलकश खताओं से इन लम्हों में ज़िन्दगी सी है
हया को ज़रा भूल जाओ
मेरी ही तरह पेश आओ
खो भी दो ख़ुद को तुम रातों में मेरी रातों में...”
मिथिलाने लगेच गाणं थांबवलं.
कारण ते शब्द… खूप जवळचे वाटत होते.
नंतर मैत्रिणींना सगळं सांगितल्यावर त्यांची उत्सुकता आणि छेडछाड सुरू झाली. मिथिला मात्र फक्त लाजत हसत बसली… मनात काहीतरी नवीन उमलत असल्याची जाणीव होत होती.
काही गोष्टी भव्य क्षणांनी सुरू होत नाहीत.
कधी कधी त्या सुरू होतात....
एका पावसाळी दुपारी,
एका नजरेतून…
आणि नकळत मनात घर करून बसणाऱ्या भावनेतून.
Comments
Post a Comment