सखीच लग्न!


प्रिय सखीस,

तुझा मेसेज (मला काहीतरी आनंदाची बातमी द्यायची आहे) वाचून मनातली धाकधूक वाढत होती. एक आठवड्यापूर्वी पासून विचारेन म्हणत होती मी, पण राहून गेले. रोज एक गाणं माझ्या मोबाईल मधे लागायचे आणि आपसूक का होईना तुझ्या लग्नाची गोष्ट होईल अस मनातून वाटायचे. त्या गाण्याच्या बोलीवर मी तुझी नझर काढतीये असच दिसायचं. खूप वाटलं सांगावं पण म्हटलं नको... सारखं लग्न लग्न वयात आलेल्या मुलीला बोलणं सांगणं काय असते ते मी स्वतः पण अनुभवत असताना तुला पण त्या विषयात ओढू वाटतं नव्हते. पण तुझा मेसेज आलेला पाहून कुणकुण का लागली काय माहित, तोच विषय जर असला तर? आणि मी तुला विचारले, "सांग, की तुझं लग्न ठरलं आहे, तू लग्न करत आहेस? मला वाटतं आहे." आणि तुझा "हो" असे आलेले उत्तर वाचून मी एवढया मोठ्याने ओरडले की काय सांगू. त्यावर समोरच बसलेल्या बाबांचा ओरडा पण खाल्ला बरका.

तसं तर आपण २ दिवसांच्या फरकाने जन्माला आलो, एकच हॉस्पिटल मधे आजू बाजूच्या वॉर्डला. जणू काही देवानेच पाठवलेली मैत्रीची गाठ ती. लहानपणी तू नेहमी नवीन काही आणले की दाखवायची आणि मी तुझे कौतुक करायचे. आजही मला आपलं १० वीत असतानाचे बोलणे आठवते. कसे मला स्वप्न पडले होते तुझ्या लग्नाचे. कसे आपण डेकोरेशन, जेवणाचा मेनू, देवाणघेवाणच्या गोष्टी, तुझ्या लग्नाचे शालू नऊवारी आणि महत्वाचे म्हणजे रुखवत कसा असेल बोलत होतो. खूप हसण्यावारी नेलेल्या गोष्टी आज सत्यात येताना त्याच खूप अप्रूप (आश्चर्य रीतीने) वाटतं आहे. 

काही वर्षांनी तुझ्या एका लिखाणाच्या रूपाने आपण परत तुझ्या लग्नाचा विषय बोलत होतो. कसं तुला पिवळी आणि हिरवी नऊवारी शालू जोड हवं होते. तुझ्या रुखवतात काय सजवायचे. तुला कशी नथ हवी आहे. तुझे मामा कसे तुला मंडपात आणतील. कसं खोटं खोटं मी अश्रू आणेन (कारण तुला दृढ विश्वास होता की मी काही करून पण रडणार नाही). पण आज तुझ्या पाठवणीच्या नुसत्या विचाराने डोळ्यात टचकन पाणी येते आहे. जीव जड होतोय. 

कळाले नाही कधी फ्रॉक, पँट शर्ट, वन पीस च्या घेण्यावरून बोलण्यावरून आता मी तुला लग्नाचे कपड्यांबद्दल विचारत आहे. असो... तुझ्या लग्नाआधी तुझे केळवण करायचे आहे. मनातून तुला पाठवायचे याचे शिक्कामोर्तब का काय तेच करायचे आहे. भेटू तुझ्या केळवणाला. आज पर्यंत मोठ्या बहिणेसारखे माझे लाड करत तू प्रेमाने काही खास खाऊ घातलेस पण आज तुला स्वतःच्या हाताने प्रेमाने खाऊ घालताना डोळ्यात आलेले मायेचे अश्रू काही वेगळेच सांगत आहेत.

Comments

  1. The feeling when your best friend is getting married is unreal yet magical! A step towards a new phase of life for her, and a bag full of memories for you. Seeing her in the bridal outfit beaming with happiness makes your heart Happy and sad at the same time as letting her go is tough but the bond is cherished forever ❤️

    ReplyDelete
    Replies
    1. Indeed. I never thought of getting emotional at my friend's wedding but I'm surprised I'm too overwhelmed... Lucky to say that from school uniform to bridal saree I'm blessed to witness this.

      Delete
  2. Thank you so much for your endless love sakhi♥️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Parallels That Never Met

गोंधळ, आणि ओळखीची कुजबुज

त्या एका नजरेनंतर After That One Look