तडजोड
मला अर्थात आजीच म्हणणं पटलं नाही पण काय करणार तिच्या वयाच्या माणसांना हे सगळं पटवून देणे कठीण आहे. मी आजीला म्हणाले काय ग आदू (लाडाने) ज्या माणसासोबत जमत नाही, आनंदी नाही तर का घुसमट करून घ्यायची त्या नात्यात? आणि पहिले नात्यात तडजोडी कराच का? आणि आपण कोण आहोत त्यांना, त्यांच्या नात्याला judge करणारे? कशाला उगाच टीका(comment)?"
आजी म्हणाली लग्न म्हणजे फक्त दोन शरीराचं नाही तर दोन मनाचं मिलन असते. प्रत्येक वळणावर, सुखदुःखात साथ देण्याच वचनं असतात. कुठलंही नातं तुमच्या भाषेत काय म्हणतात ते perfect नसतं, त्या साठी काही ठिकाणी तुम्हाला एक पाऊल मागे यावं लागतं, स्व-तडजोड (स्वतःहून केलेली तडजोड) करावी लागते. तुमच्या नात्याला टिकवायचं असेल तर मी, माझा सोडून आपण, आम्ही, आमचं यावर लक्ष देणं आलंच!"
मी मध्येच बोलले "मग त्या नात्यात स्वतःचं असं अस्तित्व नसावं का? Personal space असावी आदु!" आजी नाजूक हसली आणि म्हणाली,"जिथे प्रेम असते तिथे मार्ग मोकळे होतात, कारण .... मी टोकले आणि म्हणाले'... कारण तुम्ही तुमच्या जोडीदाराला granted घेता!!!"
आजी म्हणाली,"हे बघ चिऊ (लाडाने) नातं दोघांचं आहे. नात्यात कोणी एक वरचढ नाही होऊ शकत, कमीपणा घेणं म्हणजे तुम्ही चुकलात, तुमची चूक असं नाही. नातं म्हटलं की भांडणं, रुसवेफुगवे हे आलेच. पण तेव्हा तुम्हाला ठरवायचं असते नातं मोठं की तुम्ही मोठे?"
आदू पण जिथे चूक नाही तिथे एक पाऊल मागे याच का? माघार का घ्या? आपण ठाम रहायलाच हवं!!??
आदू म्हणाली "मला सांग टाळी एका हाताने वाजते का? नाही, तुम्हाला दोन हात जवळ आणावे लागतात, त्यांचा स्पर्श झाला, ते सोबत आले की टाळी वाजते. तसचं नात्याचेही असते. तडजोड दोघांना करावे लागेल. जिथे गरज आहे तिथेच करावी." मी परत म्हणाले, "पण कराच का?"
आदू म्हणाली, "नात्यात मतभेद असू शकतात, असतात. साहजिकच आहे, दोन वेगळी माणसं, वेगळ्या वातावरणात वाढलेली, पटवून घेणं कठीण असतं. पण चिऊ एक लक्षात ठेव नात्यात मतभेद असावेत मनभेद नाही. मत वेगळी असू शकतात, पण नातं टिकवायचं असेल तर दोघांनी मनाने एक असणं आवश्यक आहे. प्रेमकथा वाचताना खूप रंजक वाटतात पण त्या प्रत्यक्षात कश्या प्रकारे निभवायच्या ते तर दोघांवर आहे!" "आता आपलच बघ तुझं आणि माझं आत्ता एकमत नाही बरोबर म्हणून काय तू माझा राग, द्वेष करणार का? माझ्याशी बोलणं थांबवणार का? महत्वाचं आहे की तू माझे विचार ऐकतिये, मी तुझी मत जाणून घेत आहे. आपण आपले विचार लादत नाही आहोत. संभाषणातून एकमेकांना सांगत आहोत."
मी आजीच्या वाक्यावर खूप विचार केला. तिचं म्हणणं तर बरोबर आहे. मनभेद नसावेत, नातं कोण एकाच्या मोठेपणावर, एकाच्याच तडजोडीने असेल तर काहीतरी कमी राहणारच!
१८/०१/२०२२
Comments
Post a Comment