तो (ते दोघे)

गाणी ऐकत मी तल्लीन झालो होतो. अचानक गाणं बदललं आणि नवीन गाणं सुरू झालं. "एक अजनबी हसीना से युं मुलाकात हो गयी, फिर क्या हुआ ये ना पूछो...." अचानक मला तिची आठवण झाली. मला ती फार आवडायची. एक दिवस तिला कॉलेजच्या लायब्ररी मध्ये बसलेले पाहिले आणि माझ्या महानुभवी मित्रांनी मला "तिच्याकडे जा, आणि बोल" असे म्हणून ढकलले. तेव्हा राग आला होता खरा पण त्याचं निमित्ताने मी तिच्याशी बोललो, ओळख करून घेतली. मग काय आमचे हे अनुभवी मित्र हेच गाणे गायला लागले. तेव्हा पासून आम्ही वेगळे होईपर्यंत रोज आमच्यासाठी ते या ओळी म्हणायचे. आता मात्र मी फक्त त्या कधीतरी ऐकतो ते पण मोबाईल वर आणि विचारांत रमतो!!!

माझं सर्वस्व असणारी ती आज फक्त एक अजनबी वाटत आहे? पण का? अरे हो मीच नाही का तिला दूर लोटले माझ्यापासून.... खरंच आहे म्हणा, मी अजुनही तिच्यासाठी योग्य नाही आणि कधी नवतोच. वाईट तर वाटतंय, तिला पण वाटत असेल का? आज पण तिला माझी आठवण येत असेल का? आज पण ती माझं आवडत गाणं ऐकत असेल? आणि मनात म्हणत असेल की "तुम मेरे हो मेरे रहना"? आमचं आवडत गाणं ऐकत असेल? मी मात्र अजुनही तिचं आवडत "लग जा गले" रोज ऐकतोय. रोज तिला एकदा तरी संपर्क साधावा असे वाटते, पण मग विचार येतो की तिला अजुनही माझा आवाज ऐकू येण्याची आस असेल का? ती काय विचार करत असेल, करत असेल का नाही? माझ्या परत येण्याची वाट बघत असेल का?

मनाची खूप घालमेल होती आहे. आज पण वाटतं जाऊन तिला घट्ट मिठी मारुन सांगावं, "प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणीबाणी ग, ये ना प्रिये, तू ये ना प्रिये". पण काय करणार, कसं सांगणार? दूर केले आहे मी तिला कायमचे.... येईल का ती परत? शब्द कमी पडतील की मनाचे भाव? हिम्मत कशी करू तिला परत बोलवायची? छे काही सुचत नाही!!!

मन अधीर होतंय खरं, मनाला आज ही गाऊ वाटतंय "हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे...."  पण या मनाला आवरणार तरी कसं? दरवेळेस ही गाणी मला तिची आठवण करून देतात. प्रत्येक गाणं, त्याचे बोल मला कायम तिचाच भास करवतात जणू तिच्यासाठीच ही गाणी लिहिली आहेत!!!! 


गाणी आणि त्याच्या बरोबर जोडल्या गेलेल्या आठवणी काही सुटत नाहीत आणि तुटत तर अजिबात नाही.... त्यांचा विसर काही पडत नाही, मनात अजून खोलवर रुजत जातात, त्यांचे घर निर्माण करतात.....


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Parallels That Never Met

गोंधळ, आणि ओळखीची कुजबुज

त्या एका नजरेनंतर After That One Look