ती (ते दोघे)
मी माझ्या कामात अगदी गुंग होते. अचानक वाऱ्याची एक हलकी झुळूक आली आणि नाही माहीत का पण माझ्या अंगावर शहारा आला आणि माझ्या कानावर सिरीयलचे, "नको चंद्र तारे.. फुलांचे पसारे.. जिथे मी रुसावे तिथे तू असावे" हे शब्द पडले आणि त्याने मला दिलेल्या वचनांची अचानक आठवण झाली आणि क्षणार्धात त्याच्या विचारांचं काहूर माझ्या मनात निर्माण झालं.. थंडावणाऱ्या वाऱ्याच्या झुळूकेने मला त्याच्या त्या गोड स्पर्शाची आठवण करून दिली आणि मला त्याच्या आठवणीत नेले. एका क्षणात अनेक विचार डोक्यात येऊन गेले. मला असे वाटले की आत्ता जर तो माझ्या सोबत असता तर त्याच्या मिठीत मला ऊब मिळाली असती. पण क्षणांत मला एकदम बेचैन झाले.
पूर्ण दिवस मी फक्त आमच्या एकत्र घालवलेल्या क्षणांच्या आठवणींचा विचार करत होते. कसे आम्ही नेहमी एकत्र असताना सुखी होतो. एकमेकांना समजून घेताना स्वतःला समजत होतो. एकमेकांना ओरडताना मनातील काळजी एकदम भासत होती. कसे एकमेकांवर प्रेम करताना आम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकलो. कशी मी त्याला सावरताना स्वतःला सावरत होते. कशी मी त्याच्या फक्त असण्याने नेहमी आनंदी होते, कारण कोणी असो वा नसो तो कायम असणार असे वाटायचे. मला तो समजून घेऊ शकतो, पण आता....?
अचानक आता मला तो सोबत नसल्याचे दुखः होतंय. तो कधी सोबत नसणार हे परत स्वतःला समजावताना कठीण जातंय. त्याच्या आठवणी ना विसरता येतायेत, नाही की त्या पुसट होतायेत, वेळेनुसार आणि परिस्थितीत त्या अजून ठळक होतायेत. कोण चूक, कोण बरोबर काही माहीत नाही पण तो नाही याचं वाईट वाटतंय. त्याची ओढ आणि त्याच्या आठवणी आता मला शांत बसू देत नाही आहे. आजही त्याला जावून घट्ट मिठी मारून, त्याचा हात हातात घेऊन त्याला सांगावसे वाटतंय की, "तू फक्त माझा आहेस, तुझा सहवास खूप सुखदायी आहे, तुझ्या असण्याने माझ्या अस्तित्वाला एक वेगळे तेज आहे, तू कायम माझा होऊन राहशील ना?" पण नाही नाही.... आता असं काही शक्य नाही. जेवढे प्रयत्न करेन तेवढा तो माझ्यापासून लांब पळतो, दूर जातो.....
आठवणी रमणीय असतील तर ठीक नाहीतर मग अश्या बोचत राहतात, मनाला सलतात. एक विचित्र, विरुद्ध लढा सुरू झाला होता, मनात आणि डोक्यात. कधीतरी तरी त्याची ओढ सरायला हवी.....
Awesome as always 😍
ReplyDeleteVery nice 😍
DeleteThank you 😊❤️ keep loving
Delete