पाऊस
ती पावसाची संध्याकाळ होती. मी घरात गाणी ऐकत फेऱ्या मारत होते आणि अचानक वारा जोराने वाहू लागला, मातीचा सुगंध दरवळत होता, तसेच मला वाटले आता पाऊस येणार. म्हणून मी सहजच गॅलरी मध्ये उभी होते. बघता बघता अलगद पावसाचे थेंब टीपटीप करत जमिनीवर पडले. हळूहळू अचानक त्या पावसाची सर वाढत गेली आणि तो तसा धोधो कोसळू लागला. वाहणारा तो वारा, मातीचा दरवळणारा मोहक सुगंध सगळं अगदी सुखावह वाटत होतं, कमी होती ती फक्त चहाची आणि गरमा गरम भजीची. हलकेच मी हात बाहेर काढला तर अलगद एक पाण्याच्या थेंब टपकन करून पडला,तो अगदी मोत्याच्या टपोऱ्या सारखा दिसत होता. असं वाटत होतं की हा मला जशाच तसा नाही का सांभाळून ठेवता येणार?
त्या धोधो वाहणाऱ्या पावसाकडे मी एकटक बघत राहिले आणि तसचं माझ्या विचारांचे तरंग निर्माण झाले. ती झाडांची सळसळणारी पाने जणू माझ्या आयुष्यातला गोंधळ दाखवत होती आणि त्या वर पावसाचे पाणी पडतच होते, अगदी तसेच जसे बाह्य गोष्टी माझ्या गोंधळात अधिक गोंधळ निर्माण करतात. पण त्या पावसात सुद्धा तो विजेचा खांब अगदी ताठ आणि स्तब्ध उभा होता, त्याचा प्रकाश लख्ख नसला तरी दृश्यमान होता. त्या पावसाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता जणू. तो विजेचा खांब जसे मला सांगू पाहत होता की, "बाहेर कितीही गोंधळ का असेना तू शांत रहा, तुझे मन स्थिर ठेव, तुझा प्रकाश विजू देऊ नकोस; बाहेरच्या गोंधळाचा तुझ्या अंतर्मनावर परिणाम होऊ देऊ नकोस. हा पाऊस थांबणार आहे, तो क्षणिक पाहुणा आहे. त्याला येऊ देत पण त्याला तुझ्या मनात स्थिरावू देऊ नकोस". असाच विचार करत मी बसले होते.
आज पावसाने मला नवीनच धडा शिकवला. नेहमी आनंदित, प्रफुल्लीत रहा सांगणारा, जीवनाचा आनंद गरम चहा आणि भजी सोबत घ्या सांगणारा तो आज मला सांगून गेला की मी स्थिर नाही. "अवकाळी येतो किंवा कधीकधी माझा पत्ताच नसतो. माझ्या येण्याची वाट तर सगळे पाहतात पण जर मी जास्त आलो तसे माझ्या जाण्याची वाट बघतात", असेच काहीतरी सांगू बघत होता. तसेच माझ्या आयुष्यातला हा गोंधळ फार काळ नाही टिकणार. अचानक माझे लक्ष परत चालू असलेल्या गाण्यावर पडले त्याचे शब्द असे होते 'I want to fly, conquer the sky'. पक्षी जसे पाऊस थांबल्यावर आकाशात स्वच्छंद उडतात ना तसेच आज मलाही वाटले. नेहमी आनंद पसरवणारा हा पर्जन्य आज मला एक वेगळाच अनुभव देऊन गेला. तो विजेचा खांब मला आशेचा किरण देऊन गेला. काहीही झालं तरी मला येणाऱ्या वादळाच्या संघर्ष करायचा आहे. मला खचून नाही जायचे आहे पण स्थिरावून झुंज कायम ठेवायची आहे. हे वादळ क्षणिक आहे आणि लवकरच ते निघून जाणार आहे, तो पर्यंत मला दटून उभे राहायचे आहे.
धो धो, टीप टीप करत वर्षा एकदम शांत झाली आणि तसेच माझ्या विचारांचे तरंग सुद्धा आकाशात आलेल्या इंद्रधनुला, स्वच्छंद उडणाऱ्या पाखरांना, मातीच्या सुवासाला, उमललेल्या कळ्यांना पाहत शांत झाले आणि मला शीतल यांच्या कवितेच्या काही ओळी आठवल्या -
रिमझिम रिमझिम पाऊस मातीचा ओला गंध
तप्त धरणी वर कसा बरसे स्वच्छंद.
अवचित अस आभाळ आले की मन पण कसे भरून येते.
आठवणींचा शिडकावा होवून आंगण सारे भिजुन जाते.
पाऊस तोच असला तरी, प्रत्येक वेळी नवा भासतो
कधी आठवांचे आसव घेवुन येई ,तर कधी मजकडे पाहून खट्याळ हसतो.
पाऊस थांबला तरी , चिंब मन थांबले कुठे
हरवले जावूंन ते, मेघांच्या गर्दीत पिसे
-शीतल
It was a good blog journey. Thank you so much all for giving it views and sparing your valuable time reading my blogs. Hope you all loved it. For now I am taking break, but I'll be back with more amazing subjects and experience to share with you all. Till then you mention in comments on which you would like to read .
Thank you ❤️
Mast 👌☺️
ReplyDeleteमस्त.. अजून सुंदर साहित्याची वाट बघू 😊
ReplyDeleteExcellent work ... Keep it up😍✌
ReplyDeleteThank you 😊 keep loving ❣️✨
DeleteLoved it❤️😍
ReplyDeleteThank you 😊❤️ keep loving ❣️✨
Delete